बातम्या
कोल्हापूर खंडपीठ स्थापनेसाठी मुख्यमंत्र्यांची आज भेट
By nisha patil - 2/24/2025 7:21:38 AM
Share This News:
कोल्हापूर खंडपीठ स्थापनेसाठी मुख्यमंत्र्यांची आज भेट
कोल्हापूर – कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी आमदार राजेश क्षीरसागर (२४ फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
सहाजिल्ह्यांतील (कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) नागरिक, वकील आणि पक्षकार गेल्या ३० वर्षांपासून या मागणीसाठी लढा देत आहेत. खंडपीठ कृती समिती व शासन स्तरावरही यासाठी प्रयत्न सुरू असून, यापूर्वीही विविध मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.
खंडपीठाच्या मागणीसाठी माणिक पाटील-चुयेकर यांनी सुरू केलेल्या उपोषण स्थळी आमदार क्षीरसागर यांनी भेट दिली. कोल्हापूरातील ग्रामीण भागातील लोकांसाठी मुंबईपर्यंत न्यायालयीन प्रवास खर्चिक ठरत असल्याने येथेच खंडपीठ असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, हा विषय आगामी अधिवेशनातही लावून धरला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर खंडपीठ स्थापनेसाठी मुख्यमंत्र्यांची आज भेट
|