विशेष बातम्या
लग्नसराईच्या काळात बालविवाह होऊ नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 3/17/2025 4:49:27 PM
Share This News:
लग्नसराईच्या काळात बालविवाह होऊ नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे
जिल्हा पुनर्वसन समितीच्या बैठकीत बालविवाहविरोधी कार्यवाहीवर चर्चा
लग्नसराईच्या काळात बालविवाह होऊ नयेत यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला गती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. विशेषत: अशा भागात जिथे वारंवार बालविवाहाच्या घटना घडत आहेत, त्या ठिकाणी जनजागृती, समुपदेशन आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कठोरपणे कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी अमोल यांनी सांगितले की, बालविवाह होऊ नयेत म्हणून पथकात प्राधान्याने पोलिसांचा समावेश करावा. ग्रामस्थ, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविकांनी सतर्क राहून काम करावे आणि बालविवाह होत असल्याची माहिती कळल्यास तत्काळ योग्य कार्यवाही करावी. अश्या सुचना दिल्या आहेत.
लग्नसराईच्या काळात बालविवाह होऊ नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे
|