बातम्या
चिले महारांज भंडारा महोउत्सव उत्साहात संपन्न
By nisha patil - 8/5/2024 10:53:23 PM
Share This News:
बोरपाडळे : पुढारी वृत्तसेवा श्री क्षेत्र पैजारवाडी (ता.पन्हाळा) येथे श्री.सद्गुरु चिले महारांज भंडारा महोउत्सव हजारो भक्ताच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणासह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी हजारो चिले भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
पं.पु.श्री.सदगुरु चिले महाराज कासवकृती समाधी मंदिर श्री.क्षेत्र पैजारवाडी येथे सदगुरु चिले महाराज यांची ३९ वी पुण्यतिथी व भंडारा महोत्सव मंगळवार दि.७ मे रोजी सकाळी भक्तांकरवी "श्री"ना अभिषेक व विधिवत पूजा करण्यात आली. तसेच महाआरती नंतर महाप्रसाद वितरण करण्यात आला.
सायंकाळी ६ वा. बैलजोड्या,ढोल ताशे लेझीम हलगी, सनई,अशा पारंपरिक वाद्यासह भजनी टाळ मृदंगासोबत मुखी चिलेनामाचा गजर,हजारो भक्ताच्या उपस्थितीत ग्रामप्रदक्षणेसह भव्य श्रीं चा पालखी सोहळा संपन्न झाला.
यावेळी ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करून विविध सार्वजनिक मंडळाच्या कडून भक्तासाठी अल्पोपहार व चहा,सरबताची सोया करण्यात आली होती.
बुधवार दि.८ मे रोजी सकाळी ९ वा.ह.भ.प.ज्ञानेश्वर नामदास महाराज (पंढरपूर ) याचे काल्याचे कीर्तन झाले दु. १२.३० वा.हंडी फोडून गोपालकला पार पडला त्यानंतर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले
सायं ५ वा.ध्वजारोहना बरोबरच या महोत्सवाची सांगता झाली बुधवार दि.१ मे रोजी अखंड हरिनाम व ज्ञानेश्र्वरी पारायणाने सुरू झालेल्या या भंडारा महोत्सव सप्ताह कलावधीत दररोज पहाटे काकड आरती ,सकाळी श्री.ना अभिषेक,त्रिकाल आरती रात्री भजन,कीर्तन,प्रवचन शास्त्रीय गायन असे विविध कार्यक्रम झाले
.कोल्हापूर सांगली सातारा नाशिक पुणे मुबई,सोलापूर, रत्नागिरी,जिल्ह्यासह महाराष्ट्र कर्नाटक ,आंद्रप्रदेश या राज्यातील हजारो भक्तानी या उत्सवात मोठ्या श्रद्धेने सहभागी होत श्रीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
हा भंडारा महोत्सवात बोरपाडळे प्रा.आरोग्य केंद्र, यशवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल खुटाळवाडी, यांनी आरोग्य सेवा बजावली ,कोडोली पोलीसांचा बंदोबस्त,तसेच पैजारवाडी व परिसरातील तरुण सार्वजनिक मंडळ,ग्रामस्थ, सर्व भक्तागणांचे सहकार्य लाभले.
या वेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष अध्यक्ष बाबासाहेब. चव्हाण,व्यवस्थापक बाबुराव गराडे ,विश्वस्त प्रवीण पारिख,चंद्रप्रकाश पाटील,विनायक जाधव,जयसिंग पारखे, बळवंत घोसाळकर ,पुजारी बापूजी यादव आदी मान्यवर उपस्थित होते
चिले महारांज भंडारा महोउत्सव उत्साहात संपन्न
|