बातम्या

कोतोलीच्या चौगुले सायन्स काँलेजचा १००% निकाल

Chowgule Science College 100 Result


By nisha patil - 5/22/2024 5:06:52 PM
Share This News:



कोतोली :- श्रीपतराव चौगुले आर्टस ॲण्ड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली ता. पन्हाळा  ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

कोतोली येथील श्रीपतराव चौगुले आर्टस अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजने यावर्षी देखील यशाची परंपरा कायम ठेवली. यावर्षी १२ वी सायन्स विभागाचा निकाल १०० टक्के, तर आर्टस विभागाचा निकाल ९८ .९० टक्के लागल्याची माहिती प्राचार्य डॉ . विजय कुमार पाटील यांनी दिली. 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ .के.एस चौगुले ,सचिव शिवाजीराव पाटील , ज्युनियर विभाग प्रमुख सिनेट सदस्या डॉ . उषा पवार सायन्स विभाग समन्वयक  प्रकाश लव्हटे तसेच  सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे-  आर्टस मध्ये प्रथम मोरे सुहानी जयसिंग (सोनुर्ले ) ( ८४ .१७) व्दितीय चौगुले रिया आनंदा (परळी)( ८१ .३३ ) तृतीय पाटील प्रियांका महादेव (परळी)( ७६ .१७) सायन्स विभागा मध्ये प्रथम पाटील योगेश्वरी महादेव ( निवडे )( ७४ . ८३) व्दितीय सांळोखे वैष्णव युवराज (मानेवाडी )( ७४ .५० ) तृतीय सुतार सलोनी सुरेश (कोतोली ) ( ७३ . ८३ )या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना  सर्व शैक्षणिक शाखांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.                                      

 


कोतोलीच्या चौगुले सायन्स काँलेजचा १००% निकाल