बातम्या
सीताफळाच्या बियांमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, जाणून घ्या फायदे
By nisha patil - 11/3/2024 7:31:11 AM
Share This News:
मधूर चवीचे सीताफळ हे सर्वांनाच आवडते. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे ते विविध आजारांवर गुणकारी सुद्धा आहे. तसेच सीताफळाच्या बियांमध्ये सुद्धा औषधी गुण असून यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. यातील नैसर्गिक अॅन्टी ऑक्सिडेंटमुळे कॅन्सर आणि डायबेटिस सारखे आजार दूर राहतात. सीताफळ आणि त्याच्या बियांच्या फायद्यांविषयी जाणून घेवूयात.
बियांचे फायदे
१) यातील विटॅमिन-सी मुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
२) शरीराला भरपूर प्रमाणात उर्जा मिळते.
३) शरीराला विटॅमिन-बी देखील मिळते.
४) रक्ताची कमी म्हणजेच एनीमियापासून मुक्ती मिळते.
५) यातील मॅग्निशियम शरीरातील पाणी संतुलित ठेवते.
६) रक्तदाब नियंत्रित राहतो.
७) रक्तातील साखर नियंत्रित राहते.सिताफळाचे फायदे
१) यातील विटॅमिन-सी आणि विटॅमिन-ए मुळे दृष्टी चांगली होते.
२) यातील तांबे आणि फायबरमुळे पचनशक्ती वाढते. गॅस आणि अॅसिडिटीपासून आराम मिळतो.
३) यातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे कोलेस्टेरॉल कमी होते. हृदय निरोगी राहते.
४) याच्या सेवनाने ऊर्जा मिळाल्याने थकवा दूर होतो.
५) गर्भावस्थेतील मूड स्विंग, मॉर्निंग सिकनेस, आळस अशा समस्या दूर होतात.
सीताफळाच्या बियांमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, जाणून घ्या फायदे
|