बातम्या
नागरिकांना नोकरीचे आमिषाने फसवणूक करणाऱ्यांपासून सावध
By nisha patil - 1/23/2025 2:07:49 PM
Share This News:
नागरिकांना नोकरीचे आमिषाने फसवणूक करणाऱ्यांपासून सावध
जिल्हाधिकारी अमोल येडगेंने केले नागरिकांना आवाहन
जिल्ह्यातील नागरिकांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे. असे काही निदर्शनास आल्यास जिल्हा प्रशासनाशी किंवा पोलिस यंत्रणेशी संपर्क साधून तक्रार नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय.
कोल्हापूरातील सीपीआर येथील नोकरीच्या आमिषाने दोघांना जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांच्या बोगस सहीने नियुक्तीपत्रे दिल्याची बाब निदर्शनास आलीय. अशा प्रकारची कोणतीही नियुक्तीपत्रे दिलेली नाहीत. जिल्ह्यातील नागरिकांनी असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे. असे काही निदर्शनास आल्यास जिल्हा प्रशासनाशी किंवा पोलिस यंत्रणेशी संपर्क साधून तक्रार नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगेंना केले आहे. तर गुणांकानुसार निवड यादी प्रसिद्ध करून उमेदवारास विहित पद्धतीचा अवलंब करून रिक्त पदावर रितसर नियुक्ती देण्यात येते, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
नागरिकांना नोकरीचे आमिषाने फसवणूक करणाऱ्यांपासून सावध
|