बातम्या
Citu चा कामगारांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.
By nisha patil - 10/7/2024 3:05:18 PM
Share This News:
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन ( सिटू ) च्या वतीन कामगार, कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीच्या पूर्ततेसाठी आज देशभर आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोल्हापूर जिल्हा कमिटीच्या वतीनं आंदोलन करण्यात आल.
यावेळी कामगारांना कायद्याने किमान वेतन 26 हजार रुपये प्रतिमहा करा, कामगार संहिता रद्द करण्यात याव्या, सेल्स टारगेटच्या नावाखाली वैद्यकीय प्रतिनिधीचा छळ थांबवावा, सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. आशा व गटप्रवर्तकांना राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे वेतनवाढ करून सेवेत कायम करा. यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल.
दरम्यान यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.तर मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास पुढील काळात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
या आंदोलन प्रसंगी कॉम्रेड विवेक गोडसे,कॉम्रेड चंद्रकांत यादव, सुभाष जाधव, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Citu चा कामगारांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.
|