बातम्या

प्रा.संजय मंडलिक यांना विजयी करण्यास शहरवासीय सज्ज : श्री.राजेश क्षीरसागर

City residents are ready to defeat Prof Sanjay Mandalik  Mr Rajesh Kshirsagar


By nisha patil - 4/21/2024 7:03:53 PM
Share This News:



कोल्हापूर दि.२१ : लोकसभा निवडणुकीसाठी देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीने "अब कि बार ४०० पार" हा नारा दिला आहे. होणारी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर, नागरिकांच्या मुलभूत सोयी सुविधांच्या मुद्यावरच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुती घटकपक्ष लढवत असून, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी देवून कोल्हापूरच्या विकासाला चालना देण्याचे काम केले. त्यामुळे शहरातील सुजाण मतदार विरोधकांच्या टिका- टिप्पणीकडे दुर्लक्ष करून महायुतीचे शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करतील. कोल्हापूर शहरानेही कायमच शिवसेनेला मताधिक्य दिले असून, येत्या ७ मे ला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना विजयी करण्यास शहरवासीय सज्ज झाले आहेत, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
  

 महायुतीचे शिवसेना उमेदवार खास.प्रा.संजय मंडलिक यांच्या कोल्हापूर उत्तर, दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा शुभारंभ आज कोतीतीर्थी मंदिर येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने करण्यात आला. यावेळी जय भवानी जय शिवाजी, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचार मोहिमेची सुरवात करण्यात आली. 
    यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, देशात गेल्या दहा वर्षात पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी केलेले विकासाचे काम, तत्कालीन मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील विकास काम आणि सध्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्यात झालेले विकासाचे, जनहिताचे काम पाहता जनता महायुतीच्या पाठीशी ठाम उभी आहे. नियोजनात्मक प्रचारातून विकास कामाची शिदोरी घेवून मतदारांपर्यंत पोहचणार असून, कोल्हापूरची जनता महायुतीच्या बाजूने असल्याने खास.प्रा.संजय मंडलिक यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.
 

   शिवसेनेची हायटेक प्रचार यंत्रणा सज्ज
    राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रा.संजय मंडलिक यांच्या जिल्ह्यातील प्रचाराची धुरा सांभाळताना खासकरून कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून, शहरात शिवसेनेची हायटेक प्रचार यंत्रणा सज्ज केली आहे. यामध्ये सुमारे ८ एल.ई.डी व्हॅन, ८ लाऊड स्पीकर रिक्षा, पथनाट्य व वासुदेव पथक यांचा समावेश आहे. अत्याधुनिक एल.ई.डी व्हॅनद्वारे शहरातील विविध भागात प्रमुख चौकात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचे लोकहिताचे काम, महायुतीने कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिलेला निधी, शिवसेनेचे सामाजिक काम यांच्या चित्रफिती प्रसारित करून नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. यासह लाऊड स्पीकर रिक्षांद्वारे महायुतीचे उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. यासह सुमारे ४० कॉर्नर सभा, प्रभागवार प्रचारफेऱ्या, व्यक्तिगत भेटीगाठी, मॉर्निंग वॉक मंदिर भाजी मंडई अशा वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांच्या भेटीगाठींवर जोर दिला जाणार आहे. यासह मिसळ पे चर्चा द्वारे भागाभागात नागरिकांची मते जाणून घेण्यात येणार असल्याची माहिती श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली.
यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, मा.नगरसेवक नंदकुमार मोरे, मा नगरसेविका भाग्यश्री शेटके, माजी नगरसेवक किरण नकाते, रहीम सनदी, शिवसेना महिला आघाडीच्या महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, समन्वयक पूजा भोर, शहरप्रमुख साक्षी रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, युवतीसेना शहरप्रमुख नम्रता भोसले, शहरप्रमुख तेजस्विनी घाटगे, पूजा कामते, शारदा भोपळे, गौरी माळतकर, गीता भंडारी, मंगलताई कुलकर्णी, पूजा शिंदे, निवेदिता तोरस्कर, शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, उदय भोसले, सुनील जाधव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


प्रा.संजय मंडलिक यांना विजयी करण्यास शहरवासीय सज्ज : श्री.राजेश क्षीरसागर