बातम्या

भक्तिमय वातावरणात कोल्हापूरच्या अंबाबाईची नगर प्रदक्षिणा

City tour of Kolhapurs Ambabai in a devotional atmosphere


By nisha patil - 10/23/2023 4:22:45 PM
Share This News:



भक्तिमय वातावरणात कोल्हापूरच्या अंबाबाईची नगर प्रदक्षिणा 

श्री अंबाबाई देवीच्या नगर प्रदक्षिणेला हजारों भाविकांची गर्दी

 पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन देवीच्या पालखीचे केले पूजन .

देवीच्या नगर प्रदक्षिणेच्या मार्गावर रांगोळी, फुलांच्या पायघड्यांनी पालखीचे  स्वागत 

 अंबाबाईची नगर प्रदक्षिणा सोहळा आई अंबाबाईच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात पडला पार 


 मंगलमय, आणि भक्तिमय वातावरणात रविवारी रात्री करवीनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची नगर प्रदक्षिणा सोहळा आई अंबाबाईच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात पार पडला. यावेळी पालकमंत्री हसन मशीन यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन देवीच्या पालखीचे पूजन केले. नवरात्रोत्सवात आठव्या माळाला रविवारी अष्टमीच्या रात्री हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची अलोट गर्दी  पाहायला मिळाली.

कोल्हापुरात नवरात्रोत्सवामध्ये अंबाबाईने अष्टमीच्या रात्री महिषासुराचा वध केला म्हणून फुलांनी सजलेल्या वाहनातून देवीची नगर प्रदक्षिणा निघते. त्यासाठी यावेळी ही  आई अंबाबाईच्या नगरप्रदषणासाठी भाविकांनी भव्य तयारी केली होती. डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई आकर्षक रांगोळी फुलांच्या पायघड्या आसमंत उजळून टाकणारी आतेश बाजी, अशा अलौकिक मंगलमय, आणि भक्तिमय वातावरणात रविवारी रात्री करवीनिवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाईची नगर प्रदक्षिणा सोहळा आई अंबाबाईच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात पार पडला. नवरात्रोत्सवात आठव्या माळाला रविवारी अष्टमीच्या रात्री हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची अलोट गर्दी ही पाहायला मिळाली.
       

पालकमंत्री हसन मशीन यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन देवीच्या पालखीचे पूजन केले.तसेच  उद्योजक राजू जाधव यांच्या परिवाराने ही पालखीचे पूजन केले त्यानंतर परंपरेनुसार रात्री साडेनऊ वाजता ताफेच्या सलामीनंतर देवीचे वाहन नगरपरिषदेसाठी महाद्वारातून बाहेर पडली. 
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान  समितीचे सचिव तथा प्रांत सुशांत बनसोडे ,व्यवस्थापक महादेव दिंडे, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई , राजू नाटकर,  आदिल फरास आधी मान्यवर उपस्थित होते.


भक्तिमय वातावरणात कोल्हापूरच्या अंबाबाईची नगर प्रदक्षिणा