विशेष बातम्या

 सुळकुड येथे ना. हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार

Civic felicitation of Mr Hasan Mushrif at Sulkud


By nisha patil - 3/25/2025 3:00:08 PM
Share This News:



 सुळकुड येथे ना. हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार

कोल्हापूर जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा मजबूत करण्याचा निर्धार
 

जनतेच्या सेवेसाठी अखंड कार्यरत – मुश्रीफ

सुळकुडमधे भव्य नागरी सत्कार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील होते.यावेळी ना. हसन मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात, वैद्यकीय शिक्षणमंत्रीपदाच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच, राजकीय विरोधकांनी पाच वर्षांत विकासाच्या नावाने जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

ईडीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबीयांना त्रास देण्यात आला, पण जनतेच्या पाठिंब्यामुळे विरोधकांचे कारस्थान निष्फळ ठरल्याचे ते म्हणाले.गेल्या २७ वर्षांपासून मतदारसंघातील जनतेने सातत्याने आपल्यावर विश्वास ठेवला असून, जनसेवेसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सामान्य माणूस, गोरगरीब आणि महिलांचा पाठिंबा असल्याने आपला पराभव होणे शक्य नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

जिल्हा बँक संचालक भैया माने यांनी कर्जमाफीवरील ६३ कोटींच्या निर्णयाबद्दल आणि कोल्हापूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या आयटी हबबाबत ना. हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. माजी आमदार संजय घाटगे यांनी सुळकूड पाणी योजनेसाठी मुश्रीफ यांनी घेतलेल्या भूमिकेचे अभिनंदन केले आणि सुळकूड पुलानजीक भरावाऐवजी पाईप टाकून सोय करण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली.


 सुळकुड येथे ना. हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार
Total Views: 30