बातम्या
पत्नीचा विनयभंग केल्याच्या कारणावरून शांतीनगर उचगाव येथे दोन गटात हाणामारी; १० जण जखमी
By nisha patil - 7/15/2023 9:02:52 PM
Share This News:
कुंभोज वार्ताहर (विनोद शिंगे)- पत्नीचा विनयभंग करुन मारहाण केल्याच्या कारणावरून शांतीनगर उचगाव पूर्व फासेपारधी समाजामध्ये नातेवाईकांच्या दोन गटात गुरुवारी जोरदार हाणामारी झाली. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. हाणामारीत दहा जण जखमी झाले आहेत.
दरम्यान न्याय मिळाला नसल्याचे कारण पुढे करत एका गटातील शेकडो लोकांनी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या दारात तीन तास ठिय्या आंदोलन करत विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. जमावसंतप्त झाल्याने प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी पुरवणी जबाब घेऊन कलम वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी रात्री अकरा वाजता आंदोलक घरी परतले.
करवीर तालुक्यातील उचगाव शांतीनगर परिसरामध्ये फासेपारधी समाजाची वस्ती आहे. रवींद्र मल्लू चव्हाण आणि सुरेश नुराप्पा चव्हाण कुटुंबात वादाला सुरुवात झाली यामध्ये दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली. यामध्ये दहा जण जखमी झाले.परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
सुरेश नुराप्पा चव्हाण वय-३५ व्यवसाय गवंडी रा.उचगांव पुर्व शांतीनगर ता. करवीर व त्यांची पत्नी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविंद्र मल्लु चव्हाण , चंद्रकांत मल्लु चव्हाण ,अजय चंद्रकांत चव्हाण, सर्व रा. उचगांव पुर्व शांतीनगर ता. करवीर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंद केला आहे.
संशयित आरोपी यांचा भाऊ बाबु चव्हाण हा दि.09/07/2023 रोजी झालेल्या भांडणामुळे घर सोडून निघुन गेला आहे असे म्हणून तुम्हाला सोडणार नाही ठार मारणार अशी धमकी देवुन शिवीगाळी करून लाथाबुक्क्यांनी सुरेश याला मारहाण केली.सुरेश यांच्या पत्नीला घरातून मारहाण करीत उचलून नेऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या फिर्यादीनुसार पोलिसांत तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे.
तर रवींद्र मल्लू चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माणिक श्रीपती चव्हाण, संतोष प्रल्हाद चव्हाण, प्रल्हाद बाबू चव्हाण, सुरेश नुराप्पा चव्हाण, विजय उत्तम पवार, गणेश आप्पा चव्हाण, गोविंद राजू चव्हाण, प्रताप मारुती चव्हाण यांनी काठी लोखंडी रॉड, हॉकी स्टिकने मारहाण केल्याने रवींद्र मल्लू चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, गौरी चव्हाण, गंगू चव्हाण, विना चव्हाण, ताराबाई चव्हाण, अमर चंद्रकांत चव्हाण, महादेव अनिल चव्हाण हे जखमी झाल्याची तक्रार गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत सुरेश चव्हाण यांनी पत्नीचा विनयभंग केला म्हणून तक्रार घ्या म्हणून विनवणी केले असता गांधीनगर पोलिसांनी ती धुडकावून टाकले आणि एकाच गटातील लोकांना अटक केले. याबाबत गांधीनगर पोलिसांनी चुकीची फिर्याद घेतली असून घडलेल्या घटनेनुसार गुन्हा नोंद करण्याच्या मागणीसाठी दिवसभर पोलीस ठाण्याच्या आवारात नागरिकांनी तळ ठोकला होता. पण पोलिसांनी याकडे गांभीर्याने न पाहिल्याने संध्याकाळ होईल तसे मोठ्या संख्येने महिला वर्गासह नागरिक जमा झाले. अखेर नऊच्या दरम्यान जमलेल्या जमावाचा संयम सुटला. आणि त्याने संपूर्ण वसाहत बरबाद करणाऱ्या वर पोलीस का कारवाई करत नाहीत असा जाब विचारत पोलीस ठाण्यावर चाल करून गेले. जोरदार घोषणाबाजी करत पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मारण्यात आला. यावेळी संतप्त महिलांनी पोलिसांच्या वर आर्थिक आरोप करत गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांचा निषेध केला. रात्री दहा वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी आपल्या तक्रारीनुसार फिर्याद घेत असल्याचे सांगितले. पण जमावाने तात्काळ अटक केल्याशिवाय आम्ही हलणार नसल्याचे सांगितले. अखेर रात्री पावणे बारा वाजता पुरवणी जबाब घेऊन कलम वाढवण्यात आल्याने जमाव माघारी परतला.
आठ संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.१९ पर्यंत पोलीस कोठडी दिली.अधिक तपास गांधीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात करीत आहेत.
पत्नीचा विनयभंग केल्याच्या कारणावरून शांतीनगर उचगाव येथे दोन गटात हाणामारी; १० जण जखमी
|