विशेष बातम्या

गंगामाई गर्ल्स हायस्कूलचा दहावीचा ९८.१८ टक्के निकाल

Class X of Gangamai Girls High School 9818 percent result


By nisha patil - 3/6/2023 10:51:01 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी   येथील ना.बा. एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलचा १० वी परीक्षेचा ९८.१८ टक्के निकाल लागला. या यशाने हायस्कूलच्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनी शालेय परीक्षांबरोबरच क्रीडा स्पर्धामध्ये कायमच अव्वल ठरल्या आहेत. नुकताच लागलेल्या १० वी परीक्षेच्या निकालामध्ये या हायस्कूलचा ९८.१८ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये विशेष प्राविण्य ११४, प्रथम श्रेणी ११२, द्वितीय श्रेणी ३८, तृतीय ७ असा समावेश असून एकूण २७१ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले आहेत. यश संपादन केलेल्या विद्यार्थीनींचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर व शिक्षकांनी अभिनंदन केले.


गंगामाई गर्ल्स हायस्कूलचा दहावीचा ९८.१८ टक्के निकाल