शैक्षणिक
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाने शुभेच्छा देण्यात आल्या.
By nisha patil - 2/18/2025 4:09:45 PM
Share This News:
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाने शुभेच्छा देण्यात आल्या.
सातवे प्रतिनिधी उदगिरी तालुका शाहूवाडी येथील श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित उदगिरी हायस्कूल उदगिरी या ठिकाणी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व विद्यार्थ्यांकडून शाळेस ऍक्रेलिक बोर्ड भेट देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली शिक्षकाने परीक्षेला सामोरे जाताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले .
वार्षिक क्रीडा स्पर्धेत स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. इयत्ता नववीची विद्यार्थिनी अंकिता पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मुख्याध्यापक सुनील घाटगे, विद्या मंदिरचे मुख्याध्यापक रोशन मुडे, संभाजी कांबळे, प्रदीप वाडेकर ,सुभाष राऊत, शरद जाधव, भीमराव वाघमारे उपस्थित होते. सूत्रसंचालन मयूर पाटील यांनी केले प्रस्ताविक रोहित पाटील यांनी केले आभार सानवी घोलप हिने मानले.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाने शुभेच्छा देण्यात आल्या.
|