बातम्या
महापालिकेतर्फे पंधरा दिवसाला स्वच्छता अभियान : जिल्हाधिकारी येडगे
By nisha patil - 1/24/2025 6:10:16 PM
Share This News:
रंकाळा तलावावर प्रदूषण होऊ नये म्हणुन कामांना प्राधान्य द्या. रंकाळ्याचे प्रदूषण करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्यात. तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्वच्छता ठेवण्याचे सांगत तलावात म्हशी धुणाऱ्यांना दहा हजार रुपयांचा दंड करण्याचा इशारा दिलाय.
महापालिकेतर्फे आज सकाळी ऐतिहासिक रंकाळा तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आलीय. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, "महापालिकेतर्फे पंधरा दिवसाला स्वच्छता अभियान राबवली जाईल. या मोहिमेत जिल्हाधिकारी येडगे सहभागी झाले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त साधना पाटील, पंडित पाटील, अजय कोराणे, उदय गायकवाड, चेतन चव्हाण उपस्थित होते.
महापालिकेतर्फे पंधरा दिवसाला स्वच्छता अभियान : जिल्हाधिकारी येडगे
|