बातम्या
पाण्याचा खजिना परिसरात स्वच्छता मोहीम
By nisha patil - 3/10/2023 4:06:37 PM
Share This News:
पाण्याचा खजिना परिसरात स्वच्छता मोहीम
नंदीवली तालीमच्या कार्यकर्त्याने केली परिसराची स्वच्छता
महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने राबवली स्वच्छता मोहीम
कोल्हापुराचा ऐतिहासिक समुद्रवासा असा ओळख असणारा पाण्याचा खजिना. सोमवारी संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने नंगिवली तालीमच्या कार्यकर्त्याने ही स्वच्छता मोहीम राबवली.
ठिकठिकाणी उगवलेली झाडे, झुडपे, ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, यामुळे पाण्याचा खजिना आणि पाणीपुरवठा विभागाच्या टाकी परिसरात प्रचंड अस्वच्छता होती. ही अस्वच्छता निदर्शनास आल्यानंतर सोमवारी नांगवली तालीमच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी जयंतीचे अवचित साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार हातात झाडू, खुरपे, खोरे - पाट्या घेऊन परिसराची स्वच्छता केली. पाण्याच्या खजिण्यावरील उगवलेली झाडे झुडपे काढून टाकण्यात आली. तसेच प्लास्टिक कचरा एकत्रित गोळा करण्यात आला. ही मोहीम सुमारे तीन तास सुरू होती.
या मोहिमेत बाबा जामदार, नितीन शेळके, संजय जामदार, संजय भोसले, शिवाजी भोसले, सुहास साळुंखे, राम मुंडेकर, महेश शेळके, विश्वास जाधव, संजय खराडे, राजू सावंत आदीसह तालमीचे कार्यकर्ते, महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
पाण्याचा खजिना परिसरात स्वच्छता मोहीम
|