बातम्या

चौगुले महाविद्यालयात गाडगेबाबा जयंती निमित्त स्वच्छता अभियान

Cleanliness campaign on the occasion of Gadgebaba Jayanti in Chaugule College


By nisha patil - 2/23/2024 12:59:56 PM
Share This News:



चौगुले महाविद्यालयात गाडगेबाबा जयंती निमित्त स्वच्छता अभियान

स्वतः पासून स्वच्छतेची सवय अंगी लावून घ्यावी - डॉ. विजयकुमार पाटील

पन्हाळा - श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली.

या स्वच्छता मोहिमेमध्ये प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ.बी.एन. रावण,ॲक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस.एस. कुरलीकर व सर्व शिक्षक,कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला व परिसराची स्वच्छता केली.
 

 श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसराची स्वच्छता करताना शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी


चौगुले महाविद्यालयात गाडगेबाबा जयंती निमित्त स्वच्छता अभियान