बातम्या
मसाई पठारावर शहाजी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे स्वच्छता मोहीम
By nisha patil - 9/29/2023 5:11:08 PM
Share This News:
कोल्हापूर:मसाई पठारावरील प्लास्टिक, कचरा, बाटल्या एकत्रित करून शहाजी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्रशासकीय सहकारी, प्राध्यापकांनी स्वच्छता मोहीम राबवली.महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातच्या वतीने राष्ट्रीय सेवायोजना दिन, जागतिक पर्यटन दिन ,शासनाच्या स्वच्छता हीच सेवा या क्रमांतर्गत हा विशेष उपक्रम राबवला.50 हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि 32 प्राध्यापक प्रशासकीय सहकारी यांनी श्रमदान करून मसाई पठारावर स्वच्छता मोहीम यशस्वी केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, एनएसएस विभाग प्रमुख डॉ.डी.एल.काशीद पाटील, डॉ.शिवाजीराव जाधव,डॉ सौ. एन. डी. कशीद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
मसाई पठारावरील मसाई देवी मंदिर परिसर, पठारावरील व तलावा शेजारील सर्व प्लास्टिक, बाटल्या, विखुरलेल्या टाकाऊ वस्तु, कागद कचरा एकत्रित करून विद्यार्थ्यांनी एका खड्ड्यामध्ये संकलित केला.
स्वच्छता ही सेवा असून सर्वांनी स्वच्छतेची सवय अंगी बाळगावी असे आवाहन प्राचार्य डॉ. आर.शानेदिवाण यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे महत्त्व डॉ. डी. एल. काशीद पाटील यांनी विशद केले. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटनाचे महत्त्व डॉ. शिवाजीराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनीही मसाई पठारावरील संपूर्ण परिसराची पाहणी करून विविध फुलांची माहिती घेतली. मसाई पठारच्या पश्चिमेला असणाऱ्या अग्नीशीला खडकानाही यावेळी भेट देऊन माहिती घेण्यात आली. संजयसिंह माध्यमिक विद्यालय दळवेवाडी व प्राथमिक केंद्र शाळा दळवेवाडी येथेही विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले. लेझीम, दाडपट्टा, लाटी काटी याद्वारे मान्यवरांना विद्यार्थ्यांनी सलामी दिली व भारतीय खेळाचे प्रदर्शन केले. महाविद्यालय प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण , एनएसएस विभाग प्रमुख डॉ. डी.एल.काशिद पाटील, संजय सिंह माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र शिंदे, केंद्रप्रमुख सुनील अस्वले मुख्याध्यापक नागेश चौगुले, सरपंच दिलीप पाटील, , सागर दळवी, आप्पासाहेब गायकवाड यावेळी उपस्थित होते .
ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील ,डॉ एन एस जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले.
एक पुस्तक समाजासाठी, ग्रंथदान श्रेष्ठदान उपक्रमांतर्गत जमा झालेल्या पुस्तकातील 25 पुस्तके संजय सिंह माध्यमिक विद्यालय कडे यावेळी प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण , यांच्या हस्ते दान देण्यात आली.
मसाई पठारावर शहाजी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे स्वच्छता मोहीम
|