बातम्या

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यादरम्यान शहरात स्वच्छता पंधरवडा मोहिम

Cleanliness fortnight campaign in the city from 17th September to 2nd October


By nisha patil - 9/19/2024 11:02:42 PM
Share This News:



राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. स्वच्छ भारतासाठी स्वयं प्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी 2017 पासून प्रत्येक वर्षी स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जातो. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्यावतीने दि.17 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2024 यादरम्यान स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यावर्षी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2024 पासून शहरात स्वच्छता मोहीम आयोजित करणे, निर्माल्य संकलन, निर्माल्य वर्गीकरण व त्यापासून कंपोस्ट खताची मोहीम शहरातील सर्व एनजीओ यांना सहभागी करून राबविण्यात येत आहे. गणेश उत्सव 2024 अंतर्गत या मोहिमेमध्ये सर्वांच्या विविध सेवाभावी संस्थांचा सहभाग घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दि.2 ऑक्टोबर 2024 पर्यंत इतर विविध कार्यक्रमांचे आयोजनही महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यादरम्यान शहरात स्वच्छता पंधरवडा मोहिम