बातम्या

थंडी जोर पकडतीये, आहारात या 5 भाजांचा करा समावेश

Cold takes hold include these 5 vegetables in your diet


By nisha patil - 7/11/2023 7:03:59 AM
Share This News:



सध्या
हिवाळ्याचे दिवस
सुरू आहेत. थंडीच्या या दिवसांमध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तसेच निरोगी राहण्यासाठी थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरात विटामिन ए असणे आवश्यक आहे.

विटामिन ए असल्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होते. तसेच मुलांच्या योग्य विकासासाठी देखील विटामिन ए आवश्यक आहे. विटामिन ए मुळे आपली त्वचा निरोगी राहते. पण आपल्या शरीरात जर विटामिन ए ची कमतरता असेल तर एनीमिया, कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे अशा दिवसांमध्ये निरोगी राहणे खूप गरजेचे आहे.

टोमॅटो – टोमॅटो हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. टोमॅटो खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला विटामिन ए मिळण्यास मदत होते. तसेच टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात त्यामुळे टोमॅटो खाल्ल्यामुळे शरीरातील विटामिन ए ची कमतरता भरून काढते. ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच टोमॅटो खाल्ल्यामुळे रक्तातील साखरही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

गाजर – गाजर हे खायला चविष्ट लागते. सोबतच ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर देखील ठरते. गाजरामध्ये विटामिन ए सर्वाधिक आढळते. जर तुम्ही दररोज एक वाटी गाजर खाल्ले तर तुमच्या शरीरातील ए जीवनसत्वाची 334% कमतरता भरून काढता येते. त्यामुळे तुम्ही गाजराची कोशिंबीर किंवा गाजराची भाजी म्हणून तुमच्या आहारात समावेश करू शकता.

रताळे – बहुतेक लोकांना रताळे खायला आवडते. तर याच रताळ्यामध्ये विटामिन ए मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच लहान मुलांसाठी रताळे खूप फायदेशीर असते. त्यामुळे दररोज तुम्ही तुमच्या आहारात एक ते दोन रताळ्यांचे समावेश करणे आवश्यक आहे.

भोपळा – बहुतेक लोकांना भोपळा खायला आवडत नाही. पण हाच भोपळा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. भोपळ्यामध्ये काही असे गुणधर्म असतात जे आपली रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत करतात. तसेच भोपळा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात विटामिन ए ची कमतरता भासत नाही. त्यामुळे भोपळा खाणं खूप गरजेचे आहे.

कोथिंबीर – तुम्ही तुमच्या आहारात कोथिंबीरचा समावेश करणं खूप गरजेचं आहे. कारण कोथिंबीर खाल्ल्यामुळे शरीरात विटामिन ए ची कमतरता भासत नाही. तसेच कोथिंबीरमध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण देखील जास्त असते. त्यामुळे तुम्ही भाजीमध्ये किंवा भातामध्ये किंवा पराठ्यामध्ये कोथिंबिरीचा समावेश करू शकता


थंडी जोर पकडतीये, आहारात या 5 भाजांचा करा समावेश