बातम्या

सर्व आस्थापनांनी शासन निर्णयाचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

Collector Amol Yedge directed all establishments to follow the government decision


By nisha patil - 7/5/2024 7:29:52 AM
Share This News:



 जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघांतील कारखाने, इतर दुकाने व आस्थापनांनी मतदानादिवशी पूर्ण दिवस सुट्टीऐवजी २, ३ तासाची सुट मिळावी, याबाबत निवेदन दिले होते. यावर सुनावणी घेवून २, ३ तास सुट देण्याबाबतची विनंती अमान्य केली आहे. जिल्ह्यातील सर्वच आस्थापनांनी याबाबतच्या निर्णयाचे पालन करुन मतदारांना मतदानाचा मूलभूत हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

 

सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीसाठी जिल्हात 7 मे रोजी मतदान होत आहे. मतदाना दिवशी सर्व मतदार कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मतदानाकरिता मतदार कामगारांना कारखाना, दुकाने व इतर आस्थापना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देत नसतील तर अशा कामगारांनी कोल्हापूरसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने स्थापन केलेल्या दक्षता कक्षातील दुरध्वनी क्रमांक 9975045118 व 7743816733 तसेच aclkolhapur@gmail.com ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त वि. वि. घोडके यांनी केले आहे.  तसेच इचलकरंजीसाठीची तक्रार कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, इचलकरंजी, गेट नं.२. राजाराम स्टेडियम, बस स्थानक समोर, इचलकरंजी, ता. हातकणंगले. जि. कोल्हापूर येथे दुरुध्वनी क्रमांक ०२३०-२४२१३९१ आणि ईमेल आयडी aclichalkaranji@gmail.com वर दाखल करावी, असे इचलकरंजीच्या सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी कळविले आहे.


सर्व आस्थापनांनी शासन निर्णयाचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश