विशेष बातम्या
जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी स्वीकारला प्रशासकपदाचा कार्यभार
By nisha patil - 12/2/2025 4:30:06 PM
Share This News:
जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासकपदाचा कार्यभार त्यांनी स्विकारला. त्यांनी आज इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. यामध्ये कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध आणि अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आदींकडे असलेल्या कामकाजाचे वाटप आणि पाणीपुरवठा याची त्यांनी प्राधान्याने माहिती घेतली.
उपायुक्त प्रसाद काटकर व सहायक आयुक्त विजय राजापुरे यांनी याबाबतची माहिती दिली. राज्य शासनाने इचलकरंजी महापालिका प्रशासक पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी येडगे यांच्याकडे सोपविला. त्यानुसार आज उपायुक्त काटकर व सहायक आयुक्त राजापुरे यांनी त्यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भेट घेतली..
जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी स्वीकारला प्रशासकपदाचा कार्यभार
|