बातम्या
महाविद्यालयांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसुल करु नये
By nisha patil - 7/22/2024 10:42:58 PM
Share This News:
जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारणी करण्यात येऊ नये. ज्या महाविद्यालयामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून फी आकारणी केली जाईल अशा महाविद्यालयांवर शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाविद्यालयाविरुध्द कारवाई करण्यात येईल. कोणत्याही महाविद्यालयाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसुल करु नये, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारची फी वसुल करु नये. तसे आढळल्यास संबंधित महाविद्यालयाविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
महाविद्यालयांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसुल करु नये
|