बातम्या
पेठ वडगावमध्ये गुरुकुल अकॅडमीच्या संविधान वाचन सोहळ्यास आ. डॉ.विनय कोरेंची भेट
By nisha patil - 1/27/2025 1:56:49 PM
Share This News:
पेठ वडगावमध्ये गुरुकुल अकॅडमीच्या संविधान वाचन सोहळ्यास आ. डॉ.विनय कोरेंची भेट
संविधान महावाचन केल्याबद्दल "युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये नोंद
पेठ वडगाव येथे आदर्श गुरुकुल अकॅडमीच्या वतीने संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान वाचन सोहळ्यास डॉ.विनय कोरे यांनी सदिच्छा भेट देऊन सर्व विद्यार्थी आणि गुरुकुलच्या सर्व शिक्षकांचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. भारतात विविध जाती, धर्म, पंत वर्गाचे लोक आहेत. या देशात गीता, बायबल, कुराण, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी अशा धर्मग्रंथांचे पारायण केलं जातं.त्याच पद्धतीने आज आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये संविधानाचे वाचन व जागर केला आहे ही अभिमानाची बाब आहे. तसेच या उपक्रमात ११११ विद्यार्थ्यांनी ७ दिवस ४ तास संविधान महावाचन सप्ताह केल्याबद्दल "युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये नोंद झालीय.
सामान्य कुटुंबात जन्मलेले असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्याला दिले आहे. त्यामुळे भारतीयांना आपले हक्क, अधिकार व कर्तव्याची जाणीव झाली आहे. विविधतेने नटलेल्या भारतीयांना संघटित करून देश समृद्ध व सशक्त नागरिक घडवण्यासाठी संविधान आवश्यक असल्याचे मत आ. डॉ.विनय कोरे यांनी व्यक्त केले. यावेळी वारणा सहकारी दूध संघाचे संचालक डॉ.मिलिंद हिरवे,संस्थेचे संस्थापक डॉ.डी.एस.घुगरे, डॉ.एम.डी.घुगरे ,एसएससी बोर्ड अध्यक्ष राजन क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
पेठ वडगावमध्ये गुरुकुल अकॅडमीच्या संविधान वाचन सोहळ्यास आ. डॉ.विनय कोरेंची भेट
|