बातम्या

सांगवडेवाडीतील जकुबाई देवीच्या उत्सवाला आ. अमल महाडिकांची भेट

Come to the festival of Jakubai Devi in ​​Sangwadewadi


By nisha patil - 7/1/2025 7:51:05 PM
Share This News:



कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सांगवडेवाडी गावातील जकुबाई देवीच्या उत्सवाला आ.अमल महाडिकांनी भेट दिलीय. चांदीचा नवीन मुखवटा भक्तांच्या वतीने अर्पण करण्यात आलाय. यावेळी आमदार पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी आ.अमल महाडिकांचा सत्कार केला. यावेळी महिलांना मोफत उज्वला गॅस कनेक्शन वाटप कार्यक्रम आ.अमल महाडिकांच्या हस्ते संपन्न झाला.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सांगवडेवाडी गावातील जकुबाई देवीच्या उत्सवाला आ. अमल महाडिकांनी भेट दिलीय. श्री नरसिंह देवाची बहीण म्हणून जकुबाई देवीची पूजा केली जाते. देवीला सिंहासन आणि चांदीचा नवीन मुखवटा भक्तांच्या वतीने अर्पण करण्यात आलाय. यानिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी आ.अमल महाडिकांचा सत्कार केला. गावातील पात्र लाभार्थी महिलांना मोफत उज्वला गॅस कनेक्शन वाटपाचा कार्यक्रम आ.अमल महाडिकांच्या हस्ते संपन्न झालाय. तसेच भाजपा सदस्य नोंदणी अभियानही पार पडले. यावेळी मा.उपसरपंच प्रकाश खुडे, किशोर शिंदे, दादासो खोत, विशाल चव्हाण, यांच्यासह ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


सांगवडेवाडीतील जकुबाई देवीच्या उत्सवाला आ. अमल महाडिकांची भेट
Total Views: 88