बातम्या

काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या -पंतप्रधान नरेंद्र मोदी

Come with us rather than merge with Congress  PM Narendra Modi


By nisha patil - 10/5/2024 4:58:42 PM
Share This News:



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी  प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य केले होते. शरद पवारांच्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगलाच समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मोठी ऑफर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,  गेल्या 40 ते 50 वर्षांपासून महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते राजकारणात सक्रीय आहेत. ते सध्या काहीही बोलत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत गेले असून त्यांनी अनेक लोकांसोबत विचार करुन असं वक्तव्य केले असावे असं मला वाटतं. चार जूननंतर सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये टिकून राहायचं असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल असं त्यांना वाटत आहे.

 याचा अर्थ नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावे आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावे, अशी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली आहे


काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या -पंतप्रधान नरेंद्र मोदी