बातम्या
नगरोत्थान निधीतून मंजूर रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ
By nisha patil - 8/16/2024 7:28:12 PM
Share This News:
कोल्हापूर दि.१६ : लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या कामास प्राधान्य देणे, नागरिकांना न्याय देण्याच काम करण्याची शिकवण शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसारच शहरात विकास पर्व सुरु आहे. मुख्यमंत्री.एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यास कोट्यावधींचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील बरेच प्रश्न, विकास कामे मार्गी लागली आहेत. कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातही भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. शहराचा विकास हाच ध्यास ठेवून कार्य सुरु असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या विकासकामांचा आलेख उंचावला असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी रु.१०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यातील अॅपल हॉस्पिटल ते वसंतनगर ते जि.प.कंपाउंड रस्ता, गोल्ड जिम ते सदरबाजार रस्ता, जाधववाडी ते रसिका होटल रस्ता या विकास कामांचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, शहर वासियांना मुलभूत सोयी सुविधा पुरविणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरास भरघोस निधी प्राप्त होत आहे. रस्त्यांसाठी रु.१०० कोटी, रंकाळा तलाव, गांधी मैदान, ओपन जिम अशा प्रमुख विषयांसह अंतर्गत रस्ते, पाईप लाईन, ड्रेनेज, गटर, आदी मुलभूत सुविधांसाठी कोट्यावधींचा निधी मिळाला आहे. जनसेवेचे घेतलेले व्रत विकास कामाच्या माध्यमातूनही अखंडीत जोपासले जात असल्याचे सांगितले.
यावेळी माजी आमदार सुजित मिनचेकर, अशोक भंडारे, राहुल चव्हाण, विनय वाणी, तन्वीर बेपारी, अमर क्षीरसागर, बंडा माने, मुन्ना तोरस्कर, अजिंक्य पाटील, विपुल भंडारे, शमशेरसिंग कलानी, राजू बेपारी आदी भागातील नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरोत्थान निधीतून मंजूर रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ
|