बातम्या

आयुक्त नियुक्तीवरून आ. सतेज पाटलांचा राज्य सरकारला खोचक टोला

Commissioner appointed


By nisha patil - 8/19/2023 5:11:12 PM
Share This News:



कोल्हापूर महानगरपालिकेच्या तात्कालीन आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांची बदली होऊन तीन महिने झाले मात्र अद्याप कोल्हापूर महानगरपालिकेला आयुक्त मिळालेले नाहीत याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी एक महिन्यांपूर्वी चार दिवसात आयुक्त देण्याची ग्वाही दिली 15 ऑगस्ट ला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात देखील राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईला गेल्यावर आयुक्तात देणार असं म्हणाले होते मात्र अद्याप ही कोल्हापूर महापालिकेला आयुक्त मिळालेलेच नाहीत. याबाबत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांना विचारला असाता त्यांनी सध्याचे शासन किती गतिमान आहे याचीच ही प्रचिती आहे असा खोचक टोला राज्य सरकारला लगावलाय.
 


आयुक्त नियुक्तीवरून आ. सतेज पाटलांचा राज्य सरकारला खोचक टोला