बातम्या

राज्यातील गटसचिवांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कठिबध्द – आमदार प्रकाश आबिटकर

Committed to providing better facilities to group secretaries in the state


By nisha patil - 6/2/2024 3:36:38 PM
Share This News:



गारगोटी प्रतिनिधी, ग्रामीण भागाचा गाभा म्हणून विकास सेवा संस्था कार्यरत आहेत. या संस्थामाध्ये कार्यरत असणाऱ्या गटसचिवांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कठिबध्द असून त्याकरीता शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत सहकारी विभागामार्फत भुदरगड तालुक्यातील विकास सेवा संस्थांना संगणक संच व प्रिंटर्स प्रदान कार्यक्रमात बोलत होते.
 
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, ग्रामीण विकासचा गाभा म्हणून गावा-गावातील विकास सेवा संस्था कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत देशातील सर्व कृषि पतपुरवठा करणाऱ्या संस्थांचे संगणीकरण करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, सहकारमंत्री अमितभाई शहा यांच्या नेवृत्वाखाली सहकार विभागाची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून सर्व संस्थांचे संगणीकरण करण्याच्या हेतूने देशातील सर्व विकास सेवा संस्थांना संगणक संच व प्रिंटर्स देण्यात आले आहेत. विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून नागरीकांना अधिकाधिक सेवा सुविधा देण्यासाठी गट सचिवांनी प्रयत्नशिल राहावे याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा. नवनवीन प्रयोग या निमित्याने करून गावा-गावात विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. काही संस्थांनी जेनेरीक मेडीकल सुरू करण्याचा निर्णय घेत आहेत हे खुपच अभिमानास्पद आहे हाच आदर्श इतर संस्थांनी घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी सहाय्यक निबंधक संदीप शिंदे, श्रीमती दिपा पाटील, के.डी.सी.सी.विभागीय अधिकारी श्री.भोसले, बँक निरीक्षक श्री.माणगांवकर, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पाटील, जिल्हा प्रतिनिधी संभाजी पाटील, तालुका अध्यक्ष श्री.पाटील, सचिव संघटनेचे विजय परुळेकर, सुभाष देसाई, दशरथ कुपटे, सुखदेव ढेरे, शरद जाधव, सयाजी पाटील, धनाजी लोकरे, सतिश पाटील, दयानंद ऱ्हाटवळ यांच्यासह गटसचिव उपस्थित होते.

फोटो : केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत सहकारी विभागामार्फत संगणक संच व प्रिंटर्स प्रदान करताना आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित अधिकारी व सचिव.


राज्यातील गटसचिवांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कठिबध्द – आमदार प्रकाश आबिटकर