बातम्या
मिशन सह्याद्री प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीची बैठक...
By nisha patil - 3/18/2025 5:53:18 PM
Share This News:
मिशन सह्याद्री प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीची बैठक...
कोल्हापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये मिशन सह्याद्री राबविण्यात येणार
मिशन सह्याद्री प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिथे अपर जिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. या प्रकल्पाची अंमलबजावणी राज्य शासन, शाश्वत विकास केंद्र, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था, पुणे तसेच सुहस्त कन्सल्टंटस्, पुणे यांच्या सहयोगाने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड आणि भुदरगड या सात तालुक्यांमध्ये करण्यात येणार आहे.
प्रकल्पाचा मुख्य उद्देश सह्याद्री पर्वतरांगेतील निसर्ग संपत्तीचे संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापन आहे. यासाठी जनजागृती मोहिमेचे आयोजन केले जाईल, तसेच स्थानिक तरुणांना व्यवसायासाठी ठोस पर्याय देण्यात येतील. यामुळे त्यांना स्थिर रोजगाराची संधी आणि आर्थिक स्थिरता मिळवण्याचा उद्देश आहे.
मिशन सह्याद्री प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीची बैठक...
|