बातम्या

सहकाऱ्यांशी संवाद, चाय पे चर्चा..!

Communication with colleagues Chai Pay discussion


By nisha patil - 10/19/2024 10:18:56 PM
Share This News:



 इचलकरंजी येथील गावभाग महादेव मंदिर येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे व  मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा एक अत्यंत समृद्ध अनुभव मिळवला.

 'चाय पे चर्चा' या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या समस्या, अपेक्षा आणि भावना जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या चर्चेतून नव्या दृष्टिकोनांसह, समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी उपाय शोधण्याची प्रेरणा मिळाली. नागरिकांशी थेट संवाद साधताना आम्हाला केवळ शिकण्याची संधी मिळाली नाही, तर समाजाच्या गरजा आणि अपेक्षांची अधिक स्पष्ट समजही निर्माण झाली, ज्यामुळे मनाला समाधान आणि उद्दिष्टे साध्य करण्याची नवी ऊर्जा मिळाली.

तसेच आजपर्यंत केलेल्या कामांच्या बद्दल नागरिकांचे मत व प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आणि त्यांच्या सूचनांमुळे पुढील कामांना दिशा मिळाली आहे असे सांगत आपल्या विश्वासाने आम्हाला नवी ऊर्जा मिळते, आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत राहू, याचा आम्हाला दृढ विश्वास आहे असे नागरिकांना सांगितले.

यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व गावभाग परिसरातील ज्येष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते.


सहकाऱ्यांशी संवाद, चाय पे चर्चा..!