बातम्या

कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्यावी : आ. प्रकाश आबिटकर

Companies should ensure that no linking takes place under any circumstances


By nisha patil - 7/1/2025 7:49:07 PM
Share This News:



कोल्हापूर येथे कृषी विभागाचे अधिकारी, खत उत्पादक कंपन्या आणि निविष्ठा विक्रेत्यांसोबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होतं. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून खत उत्पादक कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच लिंकिंग झाल्याचे आढळल्यास विक्री केंद्रांची तपासणी करुन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशा सुचना आ. प्रकाश आबिटकरांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृह  कोल्हापूर येथे कृषी विभागाचे अधिकारी, खत उत्पादक कंपन्या आणि निविष्ठा विक्रेत्यांसोबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून खत उत्पादक कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच लिंकिंग झाल्याचे आढळल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करुन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आ. प्रकाश आबिटकरांनी अशा सुचना केल्या. आगामी काळात जिल्ह्यात सर्व खतांचा मुबलक पुरवठा होईल, असे नियोजन खत उत्पादक कंपन्या आणि कृषी विभागाने करावे. कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व निविष्ठा विक्रेत्यांच्या तपासण्या कराव्यात.

निविष्ठा केंद्रांमध्ये दर्जेदार खते, बी-बियाणे व कीटकनाशके विक्रीसाठी उपलब्ध होतील, तसेच निविष्ठाबाबत कोणतीही तक्रार येणार नाही, याची खबरदारी निविष्ठा विक्रेत्यांनी घ्यावी अश्या देखील सुचना आबिटकरांनी केल्या. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, कृषी विकास अधिकारी सारिका रेपे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व निविष्ठा विक्रेते उपस्थित होते.


कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्यावी : आ. प्रकाश आबिटकर
Total Views: 63