बातम्या
विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची तक्रार
By nisha patil - 11/23/2023 6:19:33 PM
Share This News:
अध्यक्ष पक्षपातीपणा, वेळकाढूपणा करत आहेत अशी तक्रार ठाकरे गटाचे सुनील प्रभूंनी केली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करणारं पत्र सुनील प्रभूंनी विधानभवनाला लिहीलं आहे. अध्यक्ष शिंदे गटाला झुकतं माप देतायत, तसेच साक्ष, पुरावे, प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ठराविक वेळ दिलेली असतानाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिंदे गटाला वाढीव वेळ देत कारवाई लांबवत आहेत असा आरोप या पत्रातून केला आहे
आमदार अपात्रताप्रकरणी आजच्या सुनावणीतही सुनील प्रभूंची साक्ष होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी अनिल साखरे आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे विधानभवनात पोहोचले आहेत. सुनील प्रभू सुद्धा विधानभवनात आले थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल. 21 जूनच्या बैठकीसाठी बजावलेल्या व्हिपवरून काल दिवसभर प्रभूंना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी घेरलं. व्हिप बजावण्यातच आला नव्हता असा दावा काल सुनावणीदरम्यान महेश जेठमलानींनी केला. त्यावर उत्तर देताना प्रभूंनी तो दावा फेटाळला. आता आजच्या उलटतपासणीतही या व्हिपच्या सत्यतेवरूनच प्रश्नांचा रोख राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची तक्रार
|