बातम्या
दुधाळीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा आयुक्त के. मंजुलक्ष्मी
By nisha patil - 10/1/2025 2:47:05 PM
Share This News:
आयुक्त के. मंजुलक्ष्मींनी दुधाळीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी करुन कामाचा घेतला आढावा
दुधाळीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा आयुक्त के. मंजुलक्ष्मी
राज्य शासनाच्या अमृत योजनेंतर्गत पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी दुधाळीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे बांधकाम काम सुरू असून या कामाची प्रशासक के. मंजुलक्ष्मींनी पाहणी करून कामाचा आढावा घेतलाय. दुधाळीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा अश्या सूचना आयुक्त के. मंजुलक्ष्मींनी संबंधित ठेकेदारांना दिल्या.
राज्य शासनाच्या अमृत योजनेंतर्गत पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी दुधाळीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे बांधकाम काम सुरू असून या कामाची प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेतला. या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे ९५ टक्के काम पूर्ण झालं असून राहिलेले काम त्वरित पूर्ण करून सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना दिल्या. हा प्रकल्प जानेवारी २०२५ अखेर पूर्ण करून तो कार्यान्वित करण्याच्या सूचना जल अभियंतांना दिल्या. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष पवार, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे व संबंधित ठेकेदार उपस्थित होते.
दुधाळीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा आयुक्त के. मंजुलक्ष्मी
|