ग्रामीण
श्री अंबाबाई मंदिर परिसरातील कामे जलद पूर्ण करा -जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 1/17/2025 9:19:55 PM
Share This News:
अंबाबाई मंदिर परिसरातील नूतनीकरण कामांची गती वाढवा – जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर: श्री अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड आणि नगारखान्याच्या नूतनीकरण कामांची गती वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्देश दिले. यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी कामांचा दर्जा चांगला राखून कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले.
मार्च अखेर मणिकर्णिका कुंड आणि नगारखाण्याचे काम पूर्ण करणे, तसेच जून अखेर गरुड मंडपाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
ठेकेदार चंदुलाल ओसवाल आणि अन्य संबंधितांनी कामाच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली आणि वेळेवर कामे पूर्ण होईल, असे आश्वासन दिले.
श्री अंबाबाई मंदिर परिसरातील कामे जलद पूर्ण करा -जिल्हाधिकारी अमोल येडगे
|