बातम्या

कॉम्रेड गोविंद पानसरे स्मारक लोकार्पण सोहळा मंगळवारी

Comrade Govind Pansare Memorial Inauguration Ceremony on Tuesday


By nisha patil - 2/19/2024 9:05:12 PM
Share This News:



*कॉम्रेड गोविंद पानसरे स्मारक लोकार्पण सोहळा मंगळवारी

जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

कोल्हापूर जिल्ह्यातील कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ९ व्या शहीद दिनी  स्मारकाचा लोकार्पण सोहळा, मंगळवार दि. 20 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी ५ वाजता* श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे अध्यक्षतेखाली, जेष्ठ पुरोगामी नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते  व विशेष अतिथी खासदार डी राजा, मान. आमदार बाळासाहेब थोरात, मान. भालचंद्र कानगो, आमदार सतेज पाटील, आमदार पी एन पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, मा.विजय देवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

तरी काँग्रेसच्या सर्व तालुका अध्यक्ष, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस व सर्व सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी वेळेत उपस्थित राहावे असे अहवान आयोजक यांनी केले आहे.

कार्यक्रम स्थळ - वि. स. खांडेकर प्रशाला मैदान, प्रतिभा नगर ( रेड्याच्या टकरी जवळ ) कोल्हापूर

कार्यक्रम दिनांक व वेळ -
२० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ०५ - ०० वाजता

 आपले विनीत
सचिन प्रल्हाद चव्हाण
अध्यक्ष - कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटी.


कॉम्रेड गोविंद पानसरे स्मारक लोकार्पण सोहळा मंगळवारी