शैक्षणिक
जीवनातील यशप्राप्तीसाठी मनाची एकाग्रता आवश्यक - स्वामी बुध्दानंद
By Administrator - 1/15/2025 4:32:31 PM
Share This News:
जीवनातील यशप्राप्तीसाठी मनाची एकाग्रता आवश्यक - स्वामी बुध्दानंद
कोल्हापूर दि.15 : “जीवनात यशप्राप्ती करायची असेल तर मनाची एकाग्रता आवश्यक आहे. मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न् केला पाहिजे. तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात मेडिटेशन, ध्यानयोग साधना करणे आवश्यक आहे. चांगली संगत, पुस्तके, चांगल्या विषयावरील चर्चा या गोष्टींना जीवनात स्थान द्या. तसेच सर्व प्रकारच्या प्रलोभनापासून सर्वांनी दूर राहा.” असा संदेश स्वामी बुध्दानंद यांनी आपल्या व्याख्यानातून दिला.
ते येथील विवेकानंद कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्त तसेच वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत ग्रंथालय व आय.क्यू.ए.सी. विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मनाची एकाग्रता या विषयावरील व्याख्यानप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार हे होते. या कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात रोपास पाणी घालून व शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. नीता पाटील यांनी केले. तर स्वागत सहाय्यक ग्रंथपाल श्री. हितेंद्र साळुंखे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. कैलास पाटील यानी करुन दिला. आभार डॉ.दीपक तुपे यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा.समीक्षा फराकटे यांनी केले. या कार्यक्रमास रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग, ज्युनिअर, सिनिअर कॉलेजमधील प्राध्यापक, विद्यार्थी, प्रशासकीय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथालयातील सर्व सहकाऱ्यांनी केले.
जीवनातील यशप्राप्तीसाठी मनाची एकाग्रता आवश्यक - स्वामी बुध्दानंद
|