बातम्या

विवेकानंद कॉलेज मध्ये विद्यार्थिनींसाठी व्याख्यान संपन्न

Conducted lectures for female students in Vivekananda College


By nisha patil - 4/23/2024 7:55:03 PM
Share This News:



येथील विवेकानंद ज्युनिअर  कॉलेजमध्ये शाळा सिध्दी उपक्रमांतर्गत ॲङ डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांचे लैगिक छळ, गैरवर्तणूक या विषयावर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींसाठी व्याख्यानाचे आयेाजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थिनींनी समाजामध्ये कसे राहावे, वागावे तसेच चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याबद्दल मार्गदर्शन केले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.गीतांजली साळुंखे यांनी केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.यु.आर.हिरकुडे या होत्या.  आभार प्रा. सौ एस वाय कंग्राळकर यांनी मानले.  सुत्रसंचालन प्रा माधवी देशपांडे यांनी केले.

            कार्यक्रमाचे नियोजन  महाविद्यालयाचे  प्राचार्य. डॉ. आर. आर. कुंभार  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.सौ शिल्पा भोसले, प्रा एम ए कुरणे, कॅप्टन्‍ सुनिता भोसले, प्रा.सहिदा कच्छी , रजिस्ट्रार श्री आर बी जोग यांनी केले.  या कार्यक्रमास  प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 


विवेकानंद कॉलेज मध्ये विद्यार्थिनींसाठी व्याख्यान संपन्न