बातम्या

 शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन

Conducting a meeting to review the School Education Department


By nisha patil - 5/2/2025 12:52:49 PM
Share This News:



 शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन

'पीएमश्री' शाळा योजनेच्या धर्तीवर 'सीएमश्री' शाळा योजना राबविणार : दादा भुसे

 शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मुंबई येथे मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन केलं होतं. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पीएमश्री धरतीच्या योजनेवर सीएमश्री शाळा योजना राबवणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मुंबई येथे मंगळवारी बैठकीचे आयोजन केलं होतं. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या आढावा बैठकीत  'पीएमश्री' शाळा योजनेच्या धर्तीवर 'सीएमश्री' शाळा योजना राज्यात राबविण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली. या योजनेतंर्गत तालुकास्तरावर किमान एक आदर्श शाळा निर्माण केली जाणार आहे. ही शाळा डिजिटल सुविधांनी परिपूर्ण करून शाळेत ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडा विभाग यासह सुसज्ज असेल असे यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. यावेळी बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन
Total Views: 35