बातम्या
बारावीच्या परीक्षे आधीच कोल्हापुरातील परीक्षा केंद्रावर गोंधळ.
By nisha patil - 8/2/2025 8:06:43 PM
Share This News:
बारावीच्या परीक्षे आधीच कोल्हापुरातील परीक्षा केंद्रावर गोंधळ.
11 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूल आणि कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना हॉल तिकिटाचं वाटप करण्यात आलं. आणि सकाळपासून एकच गोंधळ उडालाय.
हॉल तिकिटामध्ये चुका आढळून आल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना तिकीट मिळाली नाही. तर काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वर चुकीचे विषय आलेले आहेत. ते विषयीच्या शाळेला नाही आहे मॅथ्सच्या ठिकाणी बायोलॉजी, क्रॉप सायन्स होते त्या ठिकाणी मराठी आणि भूगोल असे विषय आले आहेत. काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावरील सह्या डुप्लिकेट केल्याच पालकांनी सांगितलं. ही घटना समोर आल्यानंतर सकाळपासून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालय. पालकांनी प्रशासनाला जाब विचारून धारेवर धरंलय.
मुख्याध्यापकांना सांगितल्यानंतर राज्य बोर्डला माहिती कळवल्याचं सांगितल. मुलांचे नुकसान न होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्यास सांगितलेय.
मात्र एकंदरीत या प्रकारामुळे या शाळेतील बोगसपणा उघडगीस आलाय. शाळेवर शिक्षण विभागाने कारवाई करावी अशी मागणी होतिय.
बारावीच्या परीक्षे आधीच कोल्हापुरातील परीक्षा केंद्रावर गोंधळ.
|