बातम्या

भोगावती कारखाना निवडणूकीत मतदान चुकीचे नोंदवल्यावरुन गोंधळ

Confusion due to incorrect registration of votes in Bhogavati factory elections


By nisha patil - 11/20/2023 3:39:40 PM
Share This News:



परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सुरू आहे.  रविवारी चुरशीने ८६.३३ टक्के मतदान झाले होते. तिरंगी लढत असली तरी निवडणूकीत विरोधकांनी चांगलीच हवा निर्माण केल्याने मोजणी प्रक्रियेकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
   

सकाळी आठ वाजता मोजणीस सुरुवात झाली. एकूण ३६ टेबलांवर मतदान केंद्र १ ते ३६ ची मोजणी सुरु करण्यात आली. साधारणता अकरा वाजता तरसंबळे येथील केंद्रावरील मोजणीवेळी विरोधी आघाडीच्या एका उमेदवाराचे मत मोजणी कर्मचाऱ्यांने सत्तारुढ आघाडीच्या उदयसिंह पाटील-कौलवकर यांच्या नावावर नोंदवल्याचे निदर्शनास आल्याने उपस्थित मोजणी प्रतिनिधींनी हरकत घेतली.
   

त्यांनी मोजणी प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी करत विकास संस्थांचे सचिव मोजणी कर्मचारी नको असा आग्रह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे धरला. यामुळे मोजणी ठिकाणी काही काळ गोंधळ उडाला. मात्र, मोजणी थांबवण्याची मागणी फेटाळून लावत मोजणी प्रक्रिया सुरुच ठेवण्यात आली आहे.


भोगावती कारखाना निवडणूकीत मतदान चुकीचे नोंदवल्यावरुन गोंधळ