बातम्या

शिरढोण येथे महिला ग्रामसभेत दारूबंदी ठरावावरून गोंधळ

Confusion over alcohol ban resolution in Women's Gram Sabha in Shirdhon


By nisha patil - 8/29/2023 1:26:36 PM
Share This News:



शिरढोण येथे महिला ग्रामसभेत दारूबंदी ठरावावरून गोंधळ

२०१६ साली गावात महिला ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव करण्यात आला होता. गावात दोन व्यावसायिकांनी   बिअरबारसाठी परवाना मागितल्याने सदस्यांनीच याला विरोध केल्याने महिला ग्रामसभेच्या विषय पत्रिकेवर विषय घेऊन निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले होते. 

यासाठी  ग्रामपंचायतीसमोर महीला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ग्रामविकास अधिकारी डी. आर. कांबळे यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचताच उपस्थित बहुतांश महीलांनी दारुबंदी कायम करण्याच्या ठरावाला हात वर करुन मंजूरी दिली. मात्र माजी जिल्हा परिषद सदस्या रंजना कोळी यांनी आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही महीलांनी विरोध केल्याने शाब्दिक वादावादीतून धक्काबुक्की करत हाणामारी सुरू झाली.सरपंच हेरवाडे यांनी शांततेते आवाहन केले असता गोंधळात पुरुषांनी भाग घेतल्याने वाद अधिकच पेटला. वादावादीतून सभेच्या टेबलावरील प्रोसिंडींगही फाडण्यात आली. या गोंधळाची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस हे घटनास्थळी दाखल झाले .
  

सरपंच हेरवाडे यांनी गावातील दारुबंदीचा ठराव कायम करण्याचा विषय वाचताच बहुतांश महीलांनी हात वर करून मंजुरी दिली. तर काही महीलांनी म्हणणे मांडण्याचा पुन्हा प्रयत्न केल्याने महीलांतून वाद सुरू झाल्याने सरपंच हेरवाडे यांनी सभा आटोपती घेत सभा संपल्याचे जाहीर केलं सभेला उपसरपंच रेश्मा चौधरी, भारती मगदूम, संगीता मगदूम, शर्मिला टाकवडे, तेजस्विनी पाटील, संगीता चौताळे, अनिता मोरडे, ललिता जाधव यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.


शिरढोण येथे महिला ग्रामसभेत दारूबंदी ठरावावरून गोंधळ