बातम्या

ऊस दर आंदोलनातील सन्मानजनक तोडग्याबद्दल सत्कार....

Congratulations for the honorable settlement in sugarcane rate agitation


By nisha patil - 11/25/2023 4:51:28 PM
Share This News:



ऊस दर आंदोलनातील सन्मानजनक तोडग्याबद्दल पालकमंत्री  हसन मुश्रीफ यांचा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले, कालच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनी वरून आंदोलनातील सन्मानजनक तोडग्याबद्दल धन्यवाद मानले. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही समन्वयाची भूमिका घेतल्यामुळे सन्मानजनक तोडगा काढून हंगाम सुरळीत सुरू झालाअसेही ते म्हणाले. यानंतर शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर म्हणाले ऊसदर आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या भावना शेतकरी संघटनेची भूमिका आणि साखर कारखाने यांच्यामध्ये पालकमंत्री मुश्रीफ यांनी समन्वयाने चर्चा घडवून आणली आणि चांगला तोडगा काढला.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, अविनाश मगदूम, कसबा सांगाव, ग्रामपंचायत सदस्य दीपक हेगडे,संतोष मगदूम, कुमार पाटील, अनिल माने, निलेश चौगुले आदि प्रमुख उपस्थित होते.


ऊस दर आंदोलनातील सन्मानजनक तोडग्याबद्दल सत्कार....