बातम्या
महिला वर्ल्डकप खोखोपटू वैष्णवी पोवारचे अभिनंदन...
By nisha patil - 1/29/2025 12:58:22 PM
Share This News:
महिला वर्ल्डकप खोखोपटू वैष्णवी पोवारचे अभिनंदन...
करंजीवनेच्या कन्येची जागतिक पातळीवर धडक...
वैष्णवी कोल्हापुरात येताच तिचा जाहीर सत्कार करणार...
दिल्लीत नुकत्याच पहिल्या महिला वर्ल्डकप खो-खो स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत भारतीय संघात वैष्णवी बजरंग पोवारचा समावेश होता. भारतासह जगातील 24 देश सहभागी झालेल्या स्पर्धेत हा वर्ल्डकप भारतीय संघाने जिंकला. या जागतिक पातळीवरील यशाबद्दल वैष्णवी पोवार हिचे दूरध्वनीद्वारे ना.हसन मुश्रीफांनी अभिनंदन केले.
दिल्लीत नुकत्याच पहिल्या महिला वर्ल्डकप खो-खो स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत भारतीय संघात करंजीवने ता. कागल येथील कन्या वैष्णवी बजरंग पोवार हिचा समावेश होता. भारतासह जगातील 24 देश सहभागी झालेल्या स्पर्धेत हा वर्ल्डकप भारतीय संघाने जिंकला. या जागतिक पातळीवरील यशाबद्दल वैष्णवी पोवार हिचे दूरध्वनीद्वारे ना.हसन मुश्रीफांनी अभिनंदन केले.
दूरध्वनीवरून वैष्णवीशी बोलताना ना.हसन मुश्रीफ म्हणाले, वैष्णवी, तुझ्या या यशाचा आम्हा समस्त कोल्हापूर जिल्ह्यासह भारतवासीयांना सार्थ अभिमान आहे. खेळाडू म्हणून तुझ्या पाठीशी खंबीरपणे आम्ही सर्वजण उभे आहोत. अजूनही यशाचा फार मोठा पल्ला तुला गाठायचा आहे. वैष्णवी कोल्हापुरात येताच तिचा जाहीर सत्कार करणार असल्याचेही त्यानी सांगितले.
महिला वर्ल्डकप खोखोपटू वैष्णवी पोवारचे अभिनंदन...
|