बातम्या

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन

Congratulations to shooter Swapnil Kusale from Guardian Minister Hasan Mushrif


By nisha patil - 1/8/2024 10:34:22 PM
Share This News:



 पॅरीस येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजीमध्ये स्वप्नील कुसाळे यांनी कांस्यपदक मिळवून राज्यासह देशाचे नाव उज्वल केले आहे, कोल्हापूरकरांसाठी स्वप्नील यांच्या या गौरवास्पद कामगिरीचा अभिमान आहे, अशा शब्दांत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वप्नील कुसाळे यांची अभिनंदन केले आहे. 
       
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील नेमबाज स्वप्नील सुरेश कुसाळे यांनी नेमबाजीत ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. 
        
मुंबईत असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वप्नील कुसाळे यांच्या कांबळवाडी ता. राधानगरी येथे असलेल्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि अभिनंदन केले. 
        
पालकमंत्री हसन मुश्रीफ शुभेच्छा संदेशात म्हणतात, कोल्हापूरला खेळाचा इतिहास आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक खेळांना व खेळाडूंना प्रोत्साहन दिले होते. कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक क्रीडा प्रकारात खाशाबा जाधव यांनी पहिले पदक पटकावून दिले होते. तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नील कुसाळे यांनी कांस्यपदक मिळवून देवून राज्य आणि देशात आनंद आणि उत्साह निर्माण केला आहे. त्यांच्या या भरघोस यशामुळे नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल. 
 
कांबळवाडीसारख्या ग्रामीण भागातील अवघ्या 29 वर्षांच्या युवकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्वल केले आहे. स्वप्निलच्या यशात त्याचे आई वडील, कुटुंबिय, प्रशिक्षक, मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान आहे. स्वप्निल व त्याच्या कुटुंबीयांचे अभिनंदन.. ! अशा शब्दात अभिनंदन केले . तसेच; स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. 

पालकमंत्री  मुश्रीफ म्हणाले, स्वप्निल कुसाळे यांच्या या जागतिक पातळीवरील उज्वल कामगिरीबद्दल त्यांची कोल्हापुरात मिरवणूक तर काढूच. दरम्यान; कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खेळ आणि खेळाडूंसाठी अधिकाधिक सुविधा निर्माण करून खेळासाठी चांगले वातावरण निर्माण करण्याचाही प्रयत्न शासन निश्चितपणाने करेल.


पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन