बातम्या
काँग्रेसचे उमेदवार बाजीराव खाडे यांचे सहा वर्षासाठी पक्षातून निलंबन
By nisha patil - 4/24/2024 9:22:07 PM
Share This News:
कोल्हापूर लोकसभेसाठी एकेकाळी इच्छुक असणारे काँग्रेसचे उमेदवार बाजीराव खाडे यांचं पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आल आहे.
कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले बाजीराव खाडे हे काँग्रेस चे राष्ट्रीय सचिव असून त्यांनी लोकसभेसाठी आग्रह धरला होता. पण त्यांच्या पदरी निराशा आणि कोल्हापूर लोकसभेसाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावा वर काँग्रेसने शिका मोर्तब केला. त्यामुळे बाजीराव खाडे यांनी बंडखोरीची भूमिका घेत अखेर अपक्ष म्हणून कोल्हापूर लोकसभा निवडण्याची तयारी दर्शवली.
काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव असणारे आणि गांधी परिवाराचे जवळचे मांडले जाणारे बाजीराव खाडे हे काँग्रेस मधून लोकसभेची तयारी करत असतानाच त्यांनी कोल्हापुरात अनेक ठिकाणी बॅनर लावून काँग्रेसचे तिकीट आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास ही व्यक्त केला मात्र ऐनवेळी पारड फिरलं आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी मिळाली
आम्हाला उमेदवारी देऊ नका पण किमान आमचा विचार तर करा गेल्या 28 वर्षापासून काँग्रेस पक्षात काम करत असलेल्या बाजीराव खाडे यांनी आपली खंत व्यक्त केली. पक्षात असताना काम करून घ्यायचं आणि काम झाल्यानंतर वाऱ्यावर सोडून द्यायचं याचा परिणाम म्हणूनच आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे कोल्हापूर मतदार संघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आणि गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसची धुरा सांभाळत असलेल्या बाजीराव खाडे यांनी आपली खदखद व्यक्त केली.
काँग्रेसचे उमेदवार बाजीराव खाडे यांचे सहा वर्षासाठी पक्षातून निलंबन
|