बातम्या
मंत्री सत्तार आणि खासदारांच्या टक्केवारी चा व्हिडीओ.. काँग्रेस ची चौकशी ची मागणी
By nisha patil - 8/1/2024 7:42:32 AM
Share This News:
मंत्री सत्तार आणि खासदारांच्या टक्केवारी चा व्हिडीओ..
काँग्रेस ची चौकशी ची मागणी
शिवसेनेतील फुटीनंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झालं. त्यानंतर, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यावेळी, विरोधकांनी गद्दार... गद्दार... म्हणून शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली. मात्र, शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं एका घटनेवरुन समोर आलं आहे. हिंगोली जिल्ह्यात शिंदे गटात बेबनाव असल्याचे पाहायला मिळालं. मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्या शिवीगाळवरुन काँग्रेसने राज्य सरकारकडे चौकशीची मागणी केली आहे. तसेच, हे सरकार टक्केवारीचं सरकार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुरुवातीलाच खासदार हेमंत पाटील यांनी निधी वाटप करताना टक्केवारीचे शेण खाल्ले जात असल्याचा आरोप करीत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना थेट शिवीगाळ केली. त्यामुळे ऑनलाईन बैठकीत पाटील यांचा माईक म्युट करून पुढील बैठक घेण्याची वेळ आली. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर, माध्यमांतही याचे फुटेज पाहायला मिळाले. त्यामुळे, विरोधकांच्या हाती आयतं कोलित सापडलं. त्यावरुन, माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी व्हिडिओ शेअर करत मंत्री अब्दुल सत्तारांच्या चौकशीची मागणी केली आहे.
एकमेकांना अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करणारे हे दोन्ही महोदय शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आहेत. एक महोदय शिंदेंच्या सरकारात मंत्री पदावर विराजमान आहेत, तर दुसरे हिंगोलीचे खासदार आहेत. यांच्यातल्या भांडणात अभद्र भाषेचा वापर तर खेदजनक आहेच; पण यापेक्षा ही एक बाब गंभीर असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.
खासदार महोदयांनी भर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्र्यांवर निधीवाटप करताना टक्केवारीचं शेण खाल्ल्या
मंत्री सत्तार आणि खासदारांच्या टक्केवारी चा व्हिडीओ.. काँग्रेस ची चौकशी ची मागणी
|