बातम्या

निमंत्रण मिळूनही काँग्रेस नेते राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राहणार गैरहजर..?

Congress leader will not attend the inauguration program of Ram Mandir despite being invited


By nisha patil - 10/1/2024 5:07:40 PM
Share This News:



नवी दिल्ली  : अयोध्येतील श्रीराम मंदिराचं उद्घाटन येत्या 22 जानेवारीला होणार आहे. अयोध्येत गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिराची मागणी केली जात होती. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर अनेक वर्ष सुनावणी पार पडली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राम मंदिराबाबत सकारात्मक निर्णय दिला. त्यानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर उभारण्यात आलं आहे. येत्या 22 जानेवारीला मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाचं जगभरातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनादेखील राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. पण काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण असतानाही राम मंदिराच्या उद्घाटनाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
   

काँग्रेसकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून याबाबत स्पष्टीकरण जारी करण्यात आली आहे. आम्ही राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापन कार्यक्रमाचं निमंत्रण सन्मानाने अस्वीकार केलं आहे. अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर कोणताही काँग्रेस नेता सहभागी होणार नाही, असं काँग्रेसकडून सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


निमंत्रण मिळूनही काँग्रेस नेते राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राहणार गैरहजर..?