राजकीय

कर्नाटक निवडणुकीत ढोलताशांच्या गजरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

Congress workers cheered to the beat of drums in the Karnataka election


By nisha patil -
Share This News:



कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता उलथवून काँग्रेसने मिळविलेल्या विजयाचा उत्सव सांगलीत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी साजरा केला. सांगलीच्या काँग्रेस भवनासमोर दुपारी काँग्रेसच्या शहरातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. काँग्रेसचा ध्वज हाती घेत, ढोलवादन करीत, विजयाच्या घोषणा देत कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला. देशातील हुकूमशाही सरकारला, त्यांनी वाढविलेल्या महागाईला, जाती-धर्माच्या वाईट राजकारणाला कर्नाटकच्या जनतेने योग्य उत्तर दिले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचाही हा परिणाम असल्याचे मत यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले.
या आनंदोत्सवात नगरसेवक मयुर पाटील, शशिकांत नागे, बिपीन कदम, अमर निंबाळकर, पैगंबर शेख, तौफिक शिकलगार आदी सहभागी झाले होते.


कर्नाटक निवडणुकीत ढोलताशांच्या गजरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष