बातम्या
शाकंभारी दैवी देवराई संवर्धन उत्सवानिमित्त गावरान भाज्याचे संवर्धन कृतिशील उपक्रम
By nisha patil - 7/1/2025 7:45:07 PM
Share This News:
शाकंभारी दैवी देवराई संवर्धन उत्सवानिमित्त गावरान भाज्याचे संवर्धन कृतिशील उपक्रम
येथील निसर्ग मित्र परिवार, आदर्श सहेली मंच व कळसुबाई परिसर संवर्धन सामाजिक संस्था अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने शाकंभरी देवी देवराई संवर्धन उत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर, रुई, बनाचीवाडी, सातेरी, वाघोबाचीवाडी, गडहिंग्लज, कागल, आजरा, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, पाचगाव, नंदनवन कॉलनी इत्यादी विविध ठिकाणी नाविण्यपूर्ण परसबाग फुलवा कार्यशाळा घेण्यात आल्या. या सर्व कार्यशाळेला महिलावर्ग उदंड प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेत परसबागेचे महत्व, गरज व कशी कराची याविषयी सविस्तर आराखडा सहित माहिती निसर्ग मित्र अनिल चौगुले यांनी दिली. तसेच भाजीपाला पिकावण्यासाठी लागणारे सेंद्रिय खत घरच्या घरी कसे करायचे याविषयी प्रात्यक्षिके दाखविली. त्यानंतर १०फळभाज्या व १० पालेभाज्याचे गावरान वाणाचे बियाणे संवर्धन करण्यासाठी आले. त्याचबरोबर स्थानिक प्रजातीचे वरणा, हरभरा, बटाटा, मसुर, पांढरा कांदा, विविध प्रकारचे कंद, लाल भोपळा, वेलवांगी इत्यादी विविध भाज्याचे वाणाचे संकलन करून ते वाढवणे व बदलत्या हवामाणाला तग घेऊ राहणारे वाण भविष्यात निर्माण करणे काळाची गरज आहे असे सांगून परिसरातील पडक्या भिंती, वहीवट नसलेल्या पडीक जागा रस्त्याकडेच शेताचे बांध इत्यादी ठिकाणी विविध भाज्याचे वाण नैसर्गिक रित्या उगवलेली असतात.
त्याला सद्देस्थिती फळधारयाची होऊन पक्व झालेल्या बिया संकलन करून संस्थेकडे जमा करावेत. किंवा येणाऱ्या संक्रात व शाकंभरी देवी देवराई उत्सवात बियाण्याची देवाण - घेवाण करण्याचे आवाहन करण्यात आले.संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन राजश्री पाटील, प्रा.जयश्री भोसले बाबा राजे महाडिक, पराग केमकर, अनिल पाटील, प्रा. आर के पाटील, नितीन चव्हाण, यश चौगुले यांनी केले.
शाकंभारी दैवी देवराई संवर्धन उत्सवानिमित्त गावरान भाज्याचे संवर्धन कृतिशील उपक्रम
|