बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा
By nisha patil - 12/18/2024 3:29:02 PM
Share This News:
कोल्हापूर : येथील विवेकानंद महाविद्यालयात 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिना निमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न्ा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संविधानाच्या प्रस्तावनाचे सामुहिक वाचन आणि वचन ग्रहण करण्यात आले.
दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या देशाचे संविधान स्वीकृत करण्यात आले होते. संविधान हा देशाचा मुळ कायदा असतो. त्याचे रक्षण करणे नागरिकांची जबाबदारी आहे. देशामध्ये स्वातंत्र्य, समता व बंधूता जोपासणे संविधानामुळे शक्य झाले आहे. यामुळेच सर्व समाजाची प्रगती साधता येते. असे मत प्रा.समिक्षा फराकटे यांनी मांडले.
या कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमास एन.सी.सी. प्रमुख कॅप्टन् सुनिता भोसले, डॉ. कैलास पाटील, प्रा.सौ. शिल्पा भोसले, प्रा.दत्तात्रय जाधव, प्रा.अवधूत टिपुगडे, डॉ.जी.एस.उबाळे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग,ज्युनिअर, सिनिअर कॉलेज मधील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी एन.सी.सी. कॅडेट उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा
|